Posts

थोडा उशीर

मार्चचा अंक हातात पडल्यावर ह्या ब्लॉगचा पत्ता तुमच्यापर्यंत पोहोचला. आणि आधीचे लेख वाचण्यासाठी तुम्ही इथवर आलात. आत्तापर्यंत दोनच लेख ब्लॉगवर टाकून झाले असले तरी ह्या लेखमालेतले सर्वच लेख इथे ठेवायचे आहेत. त्याला थोडा उशीर होतोय खरा... त्याबद्दल क्षमस्व! हे लेख आणि इतरही अजून लेख इथे लवकरात लवकर यावेत यासाठी पूर्ण प्रयत्न चालू आहेत. तेव्हा थोड्या दिवसानी नक्की परत या. तसदीबद्दल क्षमस्व आणि सहकार्याबद्दल धन्यवाद!

नर मादी कशासाठी? - डॉ. मिलिंद वाटवे

( जानेवारी  95 ) एके काळी जीवशास्त्राचे शिक्षक विद्यार्थ्यांना असं सांगत असत की जीवशास्त्रात ‘ का ’ हा प्रश्न विचारायचा नाही. जे आहे ते तसं आहे. तसंच का आहे हे काही सांगता येत नाही. आज ही परिस्थिती बदलली आहे , बदलते आहे. अर्थात सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे नाहीत. पण आता प्रश्न विचारण्याच्या आणि त्यांची उत्तरं शोधण्याच्या वैज्ञानिक पद्धती रूढ झाल्या आहेत. आपण नर-मादी संबंधांविषयी बोलत असू तर पहिला प्रश्न असा विचारला पाहिजे की मुळात नर-मादी का निर्माण झाले ? या प्रश्नाला विशेष महत्त्व आहे. याचं कारण असं की ज्या जातींमध्ये नर-मादी अशी व्यवस्था असते , त्या जातींमध्ये निम्मेच प्राणी पिलांना जन्म देतात. उरलेले निम्मे म्हणजे नर तसं फारसं काहीच करत नाहीत. खालच्या प्राणीवर्गांमध्ये पिलां ची काळजी घेतली जात नाहीच. म्हणजे त्यात नराच्या सहभागाचा प्रश्नच नसतो. थोडक्यात , अंडी फलित करण्यापलिकडे नरांना काही काम नसतं. आणि शुक्रजंतू तयार करणं हे काही फार खर्चाचं अथवा कष्टाचं काम नाही. याउलट अंडी घालणं खर्चाचं आहे. प्रत्येक अंड्यामध्ये जीवाची वाढ होण्यासाठी पुरेसा अन्नाचा साठ...

प्राण्यांमधला माणूस आणि माणसातला प्राणी - डॉ.मिलिंद वाटवे

(दिवाळी 94) ती धडपड करते आहे. त्याची पकड आणखी घट्ट होत जाते. त्याला दूर लोटण्याचा, त्याच्या पकडीतून सुटण्याचा ती जिवापाड प्रयत्न करते. तोही सर्व ताकदीनिशी आपली पकड कायम ठेवतो. हळूहळू तिच्या विरोधाची धार कमी होत जाते... हे ‘तो’ आणि ‘ती’ आहेत बेडकांच्या एका जातीतले. या बेडकांची रीतच अशी. मादी अंडी घालेपर्यंत नर तिला चिकटून राहतो. कधी कधी एका मादीला दोन–तीन नर सुद्धा झोंबून राहिलेले असतात. एकदा अंडी फलित झाली की नरांचं काम झालं. ते त्या मादीला सोडून जातात. बेडकांमध्ये नर मादीपेक्षा लहान असतात. गॅमॅरस नावाचा पाणपिसूच्या जातीचा एक प्राणी आहे.  त्यांच्यात नर मादीपेक्षा मोठा असतो. मादी सापडली की नर तिला धरूनच ठेवतो. तिच्यावर पूर्ण कब्जा करतो. अंडी घालण्याच्या वेळेपर्यंत. एकदा अंडी घालून झाली की तो त्या मादीला सोडून देतो. दुसर्‍या मादीचा शोध करतो. डासांच्या काही जातींमध्ये असा प्रकार दिसतो. डासांच्या चार अवस्था असतात. त्यापैकी अंडी , अळी, कोश या अवस्था पाण्यात असतात. आणि शेवटी प्रौढ प्राण्यांना पंख असतात. काही जातींमध्ये प्रौढ नर संध्याकाळच्या वेळेला, ज्यावेळी कोश फुटून प्र...

नर-मादी ते स्त्री-पुरुष ची पार्श्वभूमी

नर-मादी ते स्त्री-पुरुष ही लेखमाला डॉ. मिलिंद वाटवे यांनी 1994-95-96 या दरम्यान मिळून सार्‍याजणी मध्ये लिहिली. वीस वर्षांनी त्या लेखांकडे पाहताना, यात अजून भर घालायला हवी, यांचं एक पुस्तक व्हायला हवं असं वाटू लागलं. तेव्हा '...परत एकदा नर-मादी ते स्त्री-पुरुष' चा जन्म झाला. ही नवीन लेखमाला मिळून सार्‍याजणीमध्ये 2018 मार्चपासून सुरू होईल. पण आधीच्या लेखमालेचे संदर्भ त्यात येत राहाणं स्वाभाविक आहे. तेव्हा कोणा अभ्यासू, जिज्ञासू वाचकाला आधीची लेखमाला मुळातून वाचावी वाटली तर ती अशाप्रकारे इंटरनेटवर तरी उपलब्ध करून द्यावी यासाठी हा प्रपंच!